बिहारमध्ये माझ्यावर बलात्कार झाला असता; निवडणूक प्रचारानंतर अमिषा पटेलाचा आरोप

बिहारमध्ये माझ्यावर बलात्कार झाला असता; निवडणूक प्रचारानंतर अमिषा पटेलाचा आरोप

अभिनेत्री अमिषा पटेल

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने नुकतेच बिहार निवडणुकीत प्रचार सभा घेतली होती. प्रचारासाठी बॉलिवडू सेलिब्रिटिंना बोलवण्याचे फॅड आता वाढत आहे. मात्र अनेकदा सेलिब्रिटींना प्रचारादरम्यान काही धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लागतो. असाच काहीसा अनुभव अमीषाला आला आहे. तिची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय की, बिहारमध्ये तिला असुरक्षित वाटत होतं. या ऑडिओ क्लिपमध्ये ते लोजपनेते प्रकाश चंद्रा यांच्या प्रचाराबाबत बोलत होती. आज तक या वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत अमिषाने बिहारमधील प्रचारादरम्यानचा धक्कादायक खुलासा केला आहे.

अमीषाने सांगितले की, “मी लोजपचे उमेदवार डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे अतिथी म्हणून गेले होते. पण मला जबरदस्ती प्रचार करण्यासाठी भाग पाडले. त्यांनी आधी सांगितले की, पटनाच्या जवळपास मला रॅली करावी लागणार आहे. मात्र प्रत्यक्षात पटनापासून खूप दूर ओबरा येथे मला नेण्यात आले. प्रचार संपल्यानंतर मला त्याच दिवशी विमानाने मुंबईला परतायचे होते. मात्र मला एकटीला गावात सोडून देण्याची धमकी देऊन पुन्हा प्रचारासाठी धमकवण्यात आले.”

अमिषा पटेलने पुढे सांगितले की, “२६ ऑक्टोबर रोजी मी औरंगाबाद येथील ओबरा मतदारसंघात प्रकाश चंद्रा यांचा प्रचार केला. प्रचारादरम्यान लोकांची गर्दी वेड्यासारखी गाडीवर चढत होती. लोक गाडीवर हात मारत होते. अशा परिस्थितीत उमेदवार प्रकाश चंद्रा यांनी मला लोकांच्यामध्ये जाण्यास सांगितले. तिथे लोक वेडे झाले होते, जर मी गाडीच्या खाली उतरले असते तर लोकांनी कपडे देखील काढले असते. त्या वातावरणात माझ्यासोबत काहीही घडू शकले असते.”

डॉ. प्रकाश चंद्रा निवडून आले तर जनतेचं काय भलं करणार?

याच ऑडिओ क्लिपमध्ये अमिषाने लोजपचे उमेदवार डॉ. प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा माणून खोटारडा, घाणेरडा आणि हिंस्र प्रवृत्तीचा आहे. एका सेलिब्रिटिला तो सन्मान देऊ शकत नाही. त्याच्याकडून जनावरासारखा प्रचार करुन घेतोय. तर मग निवडून आल्यानंतर हा माणूस सामान्य जनतेला काय न्याय देणार? असा सवाल अमिषाने उपस्थित केला आहे.

डॉ. प्रकाश चंद्रा काय म्हणाले?

अमिषा पटेलच्या आरोपानंतर प्रकाश चंद्रा यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, “आम्ही जनतेच्या मतांवर निवडून येतो. माझ्या एका नातेवाईकाने रोड शो साठी अमिषा पटेलला बोलवले होते. त्यांना इथे पुर्ण सुरक्षा पुरवली गेली होती. अमिषा यांनी ऑडिओमध्ये जे सांगितले तसे त्यांच्यासोबत काहीही झालेले नाही. बिहारमध्ये देखील कलाकार आहेत. सोनाक्षी सिन्हा बिहारच्याच आहेत. खरंतर विमानतळावर अमिषाची भेट पप्पू यादवशी झाली होती. त्या दोघांनी १५ लाखांची डील करुन माझी बदनामी करण्याचा कट रचला.”

 

First Published on: October 28, 2020 7:08 PM
Exit mobile version