अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन

अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन

तारिक शाह

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तारिक शाह यांचे ३ एप्रिल रोजी निधन झाले आहे. निर्माते, दिग्दर्शक तथा अभिनेते असलेल्या तारिक शाह यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून तारिक हे किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. मागील काही दिवसांपासून ते डायलिसिसवर होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. तारिक शाह अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती होते.

‘कडवा सच’ मालिका आणि ‘जन्म कुंडली’ या चित्रपटातून तारिक शाह यांना लोकप्रियता मिळाली होती. तारिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘यादों की बारात’, ‘जखमी’, ‘गुमनाम है कोई’ , ‘मुंबई सेंट्रल’, या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच ‘जन्म कुंडली’, ‘बहार आने तक’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. तारिक शाह यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.


हे वाचा  दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीची बॉलिवूडमध्ये एंट्री

First Published on: April 3, 2021 8:14 PM
Exit mobile version