अभिनेता अपारशक्ती खुराना झाला बाबा, घरी छोट्या परीचे आगमन

अभिनेता अपारशक्ती खुराना झाला बाबा, घरी छोट्या परीचे आगमन

अभिनेता अपारशक्ती खुराना झाला बाबा, घरी छोट्या परीचे आगमन

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) बाबा झाल्याची बातमी त्याने सोशल मीडियावरुन दिली आहे. अपारशक्तीची पत्नी आकृती आहूजा खुरानाने (Akruti Ahuja Khurana) गोंडस मुलीली जन्म दिला आहे. (Actor Aparshakti Khurana became Father, bleesed with baby girl) खुराना कुटुंबात छोट्या परीचे आगमन झाल्याने खुराना कुटुंबिय अत्यंत खुश आहे. मुलीचे नाव Arzoie असे ठेवले आहे. अपारशक्ती खुराना अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) याचा भाऊ आहे. आयुषमान आणि अपारशक्ती दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांनी दिली आहे.

आयुष्मानने पोस्ट टाकताच अनेक कलाकारांनी त्याला काका झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर,सान्या मल्होत्रा, मृणाल ठाकूर,दर्शन कुमार, रिद्धीमा पंडित यासारख्या कलाकारांनी आयुष्मानला शुभेच्छा देत बाळाच्या आरोग्यासाठी त्याला आशिर्वाद देखील दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी अपारशक्ती खुरानाची पत्नी अहूजा खुरानाच्या डोहाळे जेवणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आकृती आणि तिच्या बाळाला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण खुराना परिवार एकत्र आला होता. अपारशक्ती त्याचे काम आटोपून पत्नीला भेटण्यासाठी चंदीगडला गेला होता.

अपारशक्ती लवकरच ‘हेलमेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अपारशक्ती या सिनेमातून पहिल्यांदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याआधी देखील अपारशक्ती खुराना अनेक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.


हेही वाचा – जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रा टॉपवर

First Published on: August 27, 2021 7:49 PM
Exit mobile version