अभिनेते दलिप ताहील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात अडकले!

अभिनेते दलिप ताहील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात अडकले!

दलीप ताहील

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहील यांना दारूच्या नशेत गाडी चालवत असताना झालेल्या अपघातप्रकरणी खार पोलिसांनी रविवारी संध्याकाळी अटक केली. खार पश्चिम विभागात असणाऱ्या डी. बी. मार्ग रोडवर एका रिक्षाला दिलेल्या धडकेमध्ये फिर्यादी जेनिता कश्यप गांधी (२१) हा जखमी झाला. अपघातानंतर जेनिता गांधी यांच्या मित्राने गाडीचा नंबर पहिला होता. त्यानुसार गाडी ओळखून पोलिसांनी दलीप ताहील यांना अटक केली. मात्र अटकेनंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. या अपघातानंतर कार चालक दलीप ताहील यांनी जेनिताशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली आणि न थांबता तडक सांताक्रूझच्या दिशेने निघून गेले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार खार पोलिसांनी अभिनेता दलीप ताहील यांना अटक केलेली आहे. अपघात झाला त्यावेळी दलीप ताहील नशेत असल्याचं समोर आलं आहे.

फिर्यादी जेनिता गांधी आणि त्यांचा मित्र गौरव विजय च्युग (२२) हे दोघे रविवारी संध्याकाळी ६ वाजता रिक्षाने प्रवास करत होते. मात्र, मागून आलेल्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात जेनिता यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. सध्या ताहिल यांना ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात खार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. दलीप ताहिल यांनी ‘राजा’, ’इश्क’, ‘सोल्जर’, ’मन’, ’बाजीगर’ अशा हिट चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.

First Published on: September 25, 2018 7:25 PM
Exit mobile version