अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक ,ICU मध्ये केलं दाखल

अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक ,ICU मध्ये केलं दाखल

अभिनेते दिलीप कुमार यांची पकृती पुन्हा चिंताजनक,ICU मध्ये केलं दाखल

बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर आली आहे.दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.तसेच सध्या त्यांच्यावर ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गत उपचार सुरू असल्याचे कळतेय. काल दिलीप कुमार यांना दिवसभर वारंवार श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलप कुमार यांना 10 दिवसांपूर्वीचं रुग्नालयातून घरी जाण्यास डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या त्यांचेवय 98 वर्षे इतके असून दिलीप कुमार यांना वयोमानानूसार सतत श्वास घेण्यास अडचण येत असल्याने डॉक्टरांनी तसेच त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सांगितले होते. त्यांना 6 जूनलादेखील रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. मात्र त्यांच्या डॉक्टरांकडून अजून कोणतीही अपडेट मिळालेली नाही.

आणि अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) नेहमीच दिलीप कुमार यांच्या पकृतीची काळजी घेत त्यांच्याबद्दल चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असतात.या दोघांची जोडी पाहून खरं प्रेम काय असतं, याची जाणीव होते. सायरा बानो नेहमी पत्नीचा धर्म निभावत असतात. लग्नाला बरेच वर्ष होऊनही सायरा बानो दिलीप कुमार यांची स्वतःपेक्षा अधिक काळजी घेत असतात. प्रत्येक संकटात त्या दिलीप कुमार यांच्यासोबत असतात.


हे हि वाचा – अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतिचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन


 

First Published on: June 30, 2021 2:21 PM
Exit mobile version