‘समुपदेशक’ म्हणून पुष्कर श्रोत्रीची नवी इनिंग

‘समुपदेशक’ म्हणून पुष्कर श्रोत्रीची नवी इनिंग

मराठी इंडस्ट्रीमधला अभिनेता पुष्कर श्रोत्री (pushkar shrotri) त्याच्या ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या सगळ्या माध्यमांमध्ये लीलया मुसाफिरी करणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणूनसुद्धा काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे. समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? याच प्रश्नाचं उत्तर ’36 गुण’ चित्रपटात मिळणार आहे. या चित्रपटात पुष्कर समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाजात या चित्रपटात दिसणार आहे. समित कक्कड दिग्दर्शित ’36 गुण’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दरम्यान या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर म्हणाला, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा.

Pushkar Shrotri

या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांच्या भूमिका असून त्यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. ‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘36 गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर (santosh juvekar) आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.


हे ही वाचा – सोशल मीडियावर ज्युनियर रणबीर कपूर ट्रेंड, आलियाही झाली हैराण

First Published on: October 27, 2022 6:08 PM
Exit mobile version