बॉलिवूडचा हा अभिनेता आता विकतोय बुर्जी पाव!

बॉलिवूडचा हा अभिनेता आता विकतोय बुर्जी पाव!

बॉलिवूडच्या अभिनेत्यांपैकी अनेक अभिनेत्यांनी स्ट्रगल करून बॉलिवूडमध्ये करियर केले आहे. यात शाहरूख खानबरोबर अनेक नावं घेता येतील. यातील एख नाव म्हणजे संजय मिश्रा. अभिनेता संजय मिश्रा यांचा आगामी चित्रपट कामयाब लवकरच प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाची कहाणी चरित्र अभिनेत्याच्या आयुष्याभोवती फिरते. स्ट्रगलिंग एक्टरचा अड्डा समजल्या जाणाऱ्या वर्सोवा येथील आराम नगर भागात चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता यांच्यासोबत जात असताना संजय मिश्रा यांनी तिथल्या एका स्थानिक बुर्जी पावच्या गाडीवर स्वतः बुर्जी पाव बनवला. या निमित्ताने स्वत:च्या स्ट्रगलिंग दिवासताल्या आठवणींना संजय मिश्रा यांनी उजाळा दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरिद्वार येथे संजय मिश्रा यांचा देखील स्वत:चा ठेला होता आणि त्या ठिकाणी रोहित शेट्टीने त्याला पाहिले होते.

या चित्रपटाच्या निमित्ताने संजय मिश्रा यांच्या आयुष्याचे एक चक्र पूर्ण झाले आहे. शाहरुख खानच्या चित्रपटामधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संजय मिश्रा यांच्या ‘कामायाब’ या चित्रपटाची निर्मिती स्वतः शाहरुख खानने केली आहे. गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा द्वारे निर्मित “कामायाब” ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होत असून दृष्यम फिल्म्स प्रोडक्शनसोबत रेड चिल्लीज़ एंटरटेनमेंटची प्रस्तुती आहे.

First Published on: March 1, 2020 1:32 PM
Exit mobile version