सुशांतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; महाराष्ट्र सायबर सेलने दिला कारवाईचा इशारा

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; महाराष्ट्र सायबर सेलने दिला कारवाईचा इशारा

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; महाराष्ट्र सायबर सेलने दिला कारवाईचा इशारा

बॉलिवूडचा हरहून्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काल वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यादरम्यान सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतचे मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याच्या मृतदेहाचा व्हायरल होणाऱ्या फोटोंबाबत कलाकार आणि सुशांतच्या चाहत्यांनी निषेध केला. हिच बाबत लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबर सेलनेही निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, ‘सोशल मीडियावर एक चिंताजनक ट्रेंड दिसून येत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंहद राजपूर याच्या मृतदेहाचा फोटो पसरवला जात आहे. जो त्रासदायक आहे.’

पुढील ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबर सेलने लिहिलं की, ‘सोशल मीडियावर असा फोटो पसरवणे हे कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशांच्या विरोधात आहे. त्यामुळे असे केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.’

सुशांत सिंह राजपूरतच्या आत्महत्येच्या बातमीने कुटुंब शोक व्यक्त करत आहे. त्याचे वडील अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. तसेच त्याच्या आत्महत्येच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूड विश्वतर हादरलं आहे. आज सुशांतवर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने दिली आहे. सुशांतचे वडील, केके सिंह यांच्यासह इतर दोन सदस्य सुशांतच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला दाखल झाले आहेत.


हेही वाचा – बॉलिवूड स्टार सुशांतवर आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार


 

First Published on: June 15, 2020 9:05 AM
Exit mobile version