नेटिझन्सचा उतावळेपणा; जीवित सेझलला वाहिली श्रद्धाजंली

नेटिझन्सचा उतावळेपणा; जीवित सेझलला वाहिली श्रद्धाजंली

नेटिझनचा उतावळेपणा; जीवित सेझला वाहिली श्रद्धाजंली

दोन दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्माने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मीरा रोड येथील घरात तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट देखील तिने लिहून ठेवली असल्याचे मीरा रोड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले. त्यानंतर या घटनेची बातमी करताना काही प्रसार माध्यमांनी सेझल शर्मा हिच्या फोटो वापरला. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी सेझल हिला श्रद्धांजली वाहिली. सेझलने आत्महत्या केल्याचे संदेश तिच्या कुटुंबियांनी देखील येत आहे. त्यानंतर सेझल शर्मा हिने मी आत्महत्या केला नसून मी जिवंत असल्याचं ट्विट करून खुलासा केला आहे. तसंच तिने आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंटवरून ती सुखरूप असल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर सेझलने लिहिलं आहे की, ‘माझ्या सर्व मित्रांना आणि सर्व चाहत्यांनी सांगू इच्छिते की, मी जिवंत आहे. मी अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्यामुळे खूप दुःखी आहे. मात्र माध्यमांनी कोणतीही खात्रजमा न करता माझा फोटोचा वापर करणे हे अत्यंत बेजबाबदार पणाचे आहे. या प्रकारामुळे माझ्या नातेवाईकांध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.’

सेजल शर्मा ही मुळची राजस्थानची आहे. तीन वर्षांपूर्वी तिने घरच्यांशी वाद घालून मुंबईची वाट धरली होती. चंदेरी दुनियेत नशीब आजमवण्यासाठी २०१७ साली ती मुंबईत आली. तिने मॉडलिंग क्षेत्रात काम केले. अभिनेता आमिर खान सोबत ती विवो मोबाइलच्या जाहीरातीत झळकली होती. तर काही वेबसिरीजमध्येही तिने काम केले आहे.


हेही वाचा – अभिनेता संग्रामला त्रास देणाऱ्या ‘त्या’ मुलीचा अखेर शोध लागला


 

First Published on: January 27, 2020 1:34 PM
Exit mobile version