‘या’ अभिनेत्रीने केला टॉपलेस योगा

‘या’ अभिनेत्रीने केला टॉपलेस योगा

हिंदी मालिकेतील अभिनेत्री अबिगैल पांडे हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक नवीन फोटो शेअर केला आहे. अबिगैल ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. ती नेहमी काहीना काहीतरी सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर अबिगैलीचे 455k फॉलोअर्स आहेत. सध्या अबिगैली हीने एक टॉपलेस योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा टॉपलेस योगा फोटो फारच चर्चेत आला आहे. या फोटोत ती टॉपलेस होऊन योगा करत असताना दिसत आहे.

अबिगैली पांडे हीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटरवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका सुंदर निसर्गात आपले दोन्ही हात मागच्या बाजूला जोडले असल्याचे दिसतं आहे. या फोटो सोबत तिने कॅप्शन देखील लिहिले आहे. अबिगैली ने लिहिलं, ‘माझे बरेचसे वाक्य हे दर्शवून देतील की मी न्यूड योगा करण्याला किती समर्थन देते. तुमच्यातील बहुतेकांना या मुलीची इन्स्टाग्राम पोस्ट आवडली नसेल.’

तसेच तिने असे देखील लिहिलं की, ‘न्यूड आणि योगामध्ये काहीही साम्य नाही आहे. या फोटो काढण्यापूर्वी मला लाज आणि भीती वाटत होती. मी सतत हाच विचार करत होती की लोक काय विचार करतील. मात्र माझी मैत्रीण आशका गोराडिया, माझे फोटोग्राफर आणि माझ्या अंगरक्षकांनी मला फोटो क्लिक करण्याची प्रोत्साहित केलं. त्या एका क्षणाला मी सगळ्या गोष्टींना विसरून गेले. मला माहित होत की मला कोणी नाही पाहत आहे. त्या एका क्षणासाठी मला माझ्यासाठी सर्वकाही विसरावे लागले. ही माझी कथा आहे, आपली काय आहे?’

अबिगैली पांडे ही डान्सर कोरिओग्राफर सनम जौहरला डेट करत आहे. सुत्राच्या माहितीनुसार, हे दोघ लवकरच लग्न करणार आहे.

First Published on: July 30, 2019 4:47 PM
Exit mobile version