डरना जरूरी है

डरना जरूरी है

Darna Zaruri Hai

चित्रपट असो किंवा मालिका पूर्वी कलाकार हा भूमिकेच्याबाबतीत चोखंदळ होता. आता परिस्थिती बदललेली आहे. छोटा पडदा हा पूर्णपणे भूत, पिशाच्च, राक्षस, चेटकीण यांच्या ताब्यात गेलेला आहे. कितीतरी नामवंत कलाकारांना या भूमिका कराव्या लागत आहेत. प्रेक्षकांनाच अशा मालिका आवडतात म्हणताना कलाकारसुद्धा तशी तयारी दाखवतात. मुकेश तिवारी याच्या नंतर भूत म्हणून आता दिपा सिंग ही अभिनेत्री दिसणार आहे. अ‍ॅण्ड टीव्हीवर ‘लाल इश्क’ ही मालिका दाखवली जाते. या शनिवार, रविवारी त्यात ती दिसणार आहे.

‘लाल इश्क’ ही प्रेमावर आधारित मालिका आहे जिला रहस्याची जोड दिलेली आहे. प्रेक्षक अशा मालिका पहातो हे दिग्दर्शकाला लक्षात आले. त्याने भूताटकीचे जे काही प्रयत्न केले त्याला टीआरपीही तेवढाच जास्त मिळालेला आहे. शिखाची निवड याच कारणासाठी केलेली आहे. प्रत्यक्ष जीवनात मी भूताला घाबरतेच, परंतु या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना घाबरवणार असल्याचे ती सांगते. ‘डरना जरूरी है’ असेही ती गमतीने सांगते.

First Published on: February 2, 2019 5:03 AM
Exit mobile version