अभिनेत्री हमसा नंदिनी करतेय ब्रेस्ट कॅन्सरचा सामना, बोल्ड फोटो शेअर करत केला खुलासा

अभिनेत्री हमसा नंदिनी करतेय ब्रेस्ट कॅन्सरचा सामना, बोल्ड फोटो शेअर करत केला खुलासा

अभिनेत्री हमसा नंदिनी करतेय ब्रेस्ट कॅन्सरचा सामना, बोल्ड फोटो शेअर करत केला खुलासा

तेलुगू सिनेअभिनेत्री हमसा नंदिनी (Hamsa Nandini ) सध्या सिनेसृष्टीपासून लांब आहे. हमसा सध्या ब्रेस्ट कॅन्सर या आजाराशी झुंज देत आहे. हमसाने तिचा एक बोल्ड फोटो शेअर करत तिला कॅन्सर झाल्याचे सांगितले. या फोटोमध्ये हमसाने तिचे केस कापले आहे. हमसा ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला आहे. तिसऱ्या स्टेजला कॅन्सरशी झुंज देणारी हमसा कुठेही कोलमडून गेलेली नाही. हमसा आनंदी चेहऱ्याने कॅन्सरशी दोन हात करत आहे. हमसाने तिला कॅन्सर झाल्याची माहिती देत एक पोस्ट लिहिली आहे. हमसाने म्हटले आहे की, चार महिन्यांपूर्वी मला ब्रेस्टमध्ये लहान गाठ जाणवली. त्यानंतर मला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले आणि माझे आयुष्य बदलले.

हमसाची आई देखील ब्रेस्ट कॅन्सरी झुंज देत होती. ४० वर्षांपूर्वी त्या देखील ब्रेस्ट कॅन्सरमुळे भितीच्या छायेत जगत होत्या, असा खुलासा देखील हमसाने तिच्या पोस्टमध्ये केला आहे. ब्रेस्टमध्ये गाठ सापडल्याने मला कॅन्सर होईल अशी मला भिती होती. मेडिकल टेस्टनंतर मात्र माझी भिती खरी ठरली,असे हमसाने म्हटले आहे.

हमसाने डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदा Biopsy केली. त्यानंतर तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. हमसाने आतापर्यंत ९ किमोथेरपी केल्या आहेत. मी ही लढाई मोठ्या हुशारीने लढेन असा आत्मविश्वास हमसाने व्यक्त केलाय. मी हसत हसत ही लढाई जिंकेन असे हमसाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हमसाने शेवटी तिच्या पोस्टमध्ये म्हटलय की, मी माझी कहाणी सर्वांना सांगणार आहे कारण माझ्या कहाणीमुळे इतर लोकांना मदत होईल त्यांना या आजाराची माहिती मिळेल आणि या आजाराशी लढण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. मी लवकरच कॅन्सरवर मात करुन सिनेसृष्टीत कमबॅक करेन.


हेही वाचा – Gehraiyaan : दीपिका-अन्यन्याची ‘गहराईयाँ’ फिल्म ‘या’ दिवशी होणार रिलीज

First Published on: December 20, 2021 6:19 PM
Exit mobile version