‘हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर’

‘हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर’

कविताचा फेसबुकला बाय बाय

१४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र टिव्ही वाहिन्यांनी हा प्रश्न सोडवला आहे. लोकांची मागणी बघून अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू करण्यात आले. यात रामायण, महाभारत, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकांबरोबरच झी मराठीवरील अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू झाले. मात्र ९०च्या काळात ज्याप्रमाणे रामायण मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं तेच प्रेम पुन्हा एकदा मालिकेला मिळाल्याचे दिसून आले.

मात्र या रामायण मालिकेला उद्देशून अभिनेत्री सरीता कौशीकने ट्वीट केले आहे. एफआयआर मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री कविता कौशिक  गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. कवीता कौशीकने ट्वीटमध्ये म्हटले आहे की,‘हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर. ज्यावेळी आमच्यावर संकट कोसळलं त्यावेळी आम्हाला तुझी आठवण आली आणि आम्ही तुझ्या मालिका पाहू लागलो. नाहीतर आम्ही कायम ‘बिग बॉस’ आणि ‘रोडीज’ हेच शो पाहण्यात दंग असतो’, असं ट्विट कविताने केलं आहे.

९० च्या काळात रामायण सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव २०२० मधील प्रेक्षकांनीही घेतला. टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहे आणि टीआरपीचे सर्व विक्रम मोडीले आहेत. १९८८ साली रामायण या मालिकेने अनोखा इतिहास रचला होता. रामानंद सागर यांच्या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होतं. विशेषत: प्रभू रामाची भूमिका प्रचंड गाजली होती. इतकी की, लोकांनी आपल्या घरात राम आणि सीतेच्या तसबीरीच्या रूपात अरूण गोविल आणि दीपिकाचे फोटो लावले होते. आजही लोक श्रद्धाभावाने अरूण गोविल यांच्या पाया पडतात.

First Published on: April 4, 2020 2:00 PM
Exit mobile version