गश्मीर महाजनीसोबत मयुरी देशमुखचं Comeback; नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज

गश्मीर महाजनीसोबत मयुरी देशमुखचं Comeback; नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज

छोट्या पडद्यावरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिंदीत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवर ‘इमली’ या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनीसह मयुरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुल खान ‘फोर लायन्स’ प्रॉडक्शन अंतर्गत स्टार प्लसवर नवीन रोमँटिक मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण दाखवणारी कथा सादर केली जाणार आहे. एक नायक आणि दोन नायिकांच्या भोवती मालिकेची कथा फिरणार आहे.

मयुरीने इन्स्टाग्रामवरुन इमली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. गावातील तरुणीचा विवाह शहरी तरुणाशी जबरदस्ती लावला जातो. त्यानंतर तो शहरात परतल्यानंतर त्याच्या मैत्रिणीशी त्यांची गाठ पडते, असे कथानक प्रोमोतून दिसते. मयुरी या मालिकेत गश्मीरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे. तर मयुरीसह या मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे याच्या आत्महत्येनंतर चार महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतल्याने चाहतेही सुखावले आहेत.

मयुरी पुन्हा एकदा नव्याने सज्ज

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने ३ महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या ३२ व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. नैराश्यामुळे आशुतोषने आत्महत्या केली, असे म्हटले गेले होते. या घटनेने मयुरी देशमुखसह तिच्याच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. त्यानंतर, आता पतीच्या मृत्यूचे दुःख सावरत मयुरी पुन्हा एकदा नव्याने सज्ज झाल्याने, तिच्या चाहत्यांनीही तिचे कौतुक केले आहे.

First Published on: November 7, 2020 4:03 PM
Exit mobile version