Surekha Sikri Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं ह्रदयविकारच्या झटक्याने निधन

Surekha Sikri Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं ह्रदयविकारच्या झटक्याने निधन

Surekha Sikri Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं ह्रदयविकारच्या झटक्याने निधन

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं आहे. त्या ७५ वर्षाच्या होत्या. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. २०२० मध्ये सुरेखा सिकरी यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हापासूनचं त्यांची तब्येत खालावत होती. यात काही दिवसांपूर्वी दुसऱ्या ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या तब्येत अधिकच बिकट झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान सुरेखा सिरकी यांनी जगाचा निरोप घेतला. सुरेखा सिरक यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील सुरेखा सिरकी यांनी साकारलेली ‘दादी सा’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यांच्या भूमिकेचं भरपूर कौतुक करण्यात आलं होतं. सुरेखा सिरकी या थिएटर, टीव्ही आणि चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग होत्या. त्यांनी ‘किस्सा कुर्सी का’ या राजकीय नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर ‘तमस’, ‘मम्मो’, सलीम लंगड़े पे मत रो’, ‘लिटिल बुद्धा’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी-भरी’, ‘जुबैदा’, ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’, ‘रेनकोट’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘देव डी’ आणि ‘बधाई हो’ अशा अनेक चित्रपटांमधून दमदार अभिनय केला होता. यावेळी ‘बधाई हो’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तब्बव तीन वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘बधाई हो’ आणि ‘बालिका वधू’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याबरोबर ‘एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘सात फेरे’, ‘बनेगी अपना बात’, ‘कसर’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘जस्ट मोहब्बत’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

सुरेखा सीकरी यांचा जन्म १९ एप्रिल १९४५ रोजी दिल्ली येथे झाला. सुरेखा सिरकी यांचे बालपण अल्मोरा आणि नैनितालमध्ये गेले. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाल्या. सुरेखा सिरकी यांना १९८९ मध्ये संगीत नाटक अकादमी (Sangeet Natak Akademi Award) पुरस्कारही मिळाला आहे.

सुरेखा सिरकी यांचे वैयक्तिक जीवन

सुरेखा सिक्री यांचे वडील हवाई दलात कार्यरत होते तर आई शिक्षिका होत्या. सुरेखा सिरकी यांचा विवाह हेमंत रेगे यांच्याशी झाला होता. ज्यांमुळे त्यांना एक मुलगा आहे. राहुल सिक्री असे त्यांच्या मुलाचे नाव असून तोही एक कलाकार आहे. सुरेखा सीकरी यांची सावत्र बहीण मनारा सीकरी यांचे लग्न नसिरुद्दीन शाह यांच्याशी झाले होते मनारा आणि नसिरुद्दीन यांची एक मुलगी हीबा शाह आहे.


 

First Published on: July 16, 2021 11:03 AM
Exit mobile version