Sindhutai Sapkal : ‘एक व्यक्ती म्हणून सिंधुताईंचा अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले’, तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

Sindhutai Sapkal : ‘एक व्यक्ती म्हणून सिंधुताईंचा अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले’, तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

Sidhutai Sapkal : एक व्यक्ती म्हणून सिंधुताईंचा अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले, तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या माई म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)  यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. माईंच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सिंधुताईंच्या आयुष्यातील त्यांचा संघर्मय प्रवास ‘मी सिंधुताई सपकाळ’ (Sindhutai Sapkal)  या सिनेमातून रुपेरी पडद्यावर आणला गेला. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर (tejaswini pandit )  हा सिनेमा चित्रीत करण्यात आला. तेजस्विनीच्या करिअरमधील हा सिनेमा तिच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेले. सिंधुताईंच्या जाण्याने तेजस्विनीने देखील श्रद्धांजली वाहिली. तिच्या आयुष्यात माईंचे विशेष स्थान होते. माईंच्या जाण्याने तेजस्विनी त्यांच्यासोबतच्या आठवणींच्या उजाळा एक पोस्ट शेअर केली. ‘एक व्यक्ती म्हणून सिंधुताईंचा अविस्मरणीय प्रवास मी स्क्रिनवर जगू शकले’,असे म्हणत तेजस्विनीने भावूक पोस्ट शेअर केली.

तेजस्विनीने म्हटले आहे की, ‘अभिनेत्री म्हणून एक तेजस्विनी पंडित आहे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ या सिनेमाने दिली. सिनेमाने अनेक राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. मला अभिमान वाटतो की ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रातून माईंचे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा मला उचलता आला. एक व्यक्ती म्हणून माईंचा अविस्मरणीय प्रवास मी स्क्रिनवर जगू शकले याचा मला आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील’, असे तेजस्विनीने म्हटले आहे.

सिंधुताईंची मुलगी ममता ताई यांच्याकडून माईंच्या निधनाची बातमी तेजस्विनीला कळली. तेजस्विनीने म्हटलंय, ‘माईंच्या निधनांच्या बातमी ऐकून माझ्या पायातली ताकद गेली,मी थक्क झाले. माई आणि मी रोज संपर्कात नव्हतो. पण तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊन की तुमचं आयुष्यचं बदलून जाते आणि यात त्यांचा हातभार आहे याच त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला कधीच कुणाला नावाने हाक न मारता ‘बाळा’ म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या ‘मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस’ असे माई म्हणायच्या’, असे तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोस्टच्या शेवटी तेजस्विनीने सर्वांना विनंती देखील केली आहे तिने म्हटलेय, ‘घाई घाईने RIP लिहिण्याच्या जगात त्यांचही एक भल मोठं कुटुंब आहे ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे याचा विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूबद्दल त्यांना शोक व्यक्त करण्यासाठी वेळ द्या. ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.
ओम शांती. माई…तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई’.


हेही वाचा – sindhutai sapkal : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

First Published on: January 5, 2022 9:34 PM
Exit mobile version