सलमानसोबत विवाहबंधनात अडकायचंय ‘या’ अभिनेत्रीला!

सलमानसोबत विवाहबंधनात अडकायचंय ‘या’ अभिनेत्रीला!

अभिनेत्री जरीन खानने अभिनेता सलमान ‘वीर’ या चित्रपटात अभिनय करून बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते. यानंतर ती सलमान सोबत ‘रेडी’ या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळाली होती. मात्र मधल्या काळात जरीनने काही चित्रपटात काम केले. त्यामुळे तीचे चाहते निर्माण झाले होते. परंतु, आता जरीन वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे आणि ते कारण म्हणजे बॉलिवूड विश्वातील भाईजान सलमान खान. मात्र आता जरीन खानने सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

परंतु तसे काही नाही. ज्यावेळी जरीनला विचारण्यात आले की, ‘तूला कोणती आफवा पसरवण्यास आवडेल?’ त्यावेळी जरीनने सांगितले की, ‘मी एकच आफवा पसरवू इच्छिते की, सलमान खान माझ्याशी लग्न करतोय..’

असेही सलमान खानच्या चाहत्यांना तो कधी लग्न बंधनात आडकतोय याची उत्सुकता तर आहेच. यासोबत तो आपली आयुष्यातील साथीदार म्हणून कोणाची निवड करणार.. याची देखील वाट चाहते तेवढीच पाहत आहे. मात्र, दंबग भाईजान लग्नबंधनात अडकायच्या तयारीत नसल्याने याबद्दल कोणतेही तर्क वितर्क लावण्यात काहीही अर्थ नाही.

First Published on: August 18, 2019 12:12 PM
Exit mobile version