‘वजन कमी करण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्ज’, राखीने केले धक्कादायक खुलासे!

‘वजन कमी करण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्ज’, राखीने केले धक्कादायक खुलासे!

राखी सावंत

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थ चौकशीच्या जाळ्यात अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्री अडकल्या आहेत. या प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची एनसीबीकडून चौकशी होणार आहे. तर अभिनेत्री सारा अली खानची उद्या शनिवारी चौकशी होणार आहे. दरम्यान, राखी सावंत हिनं बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्ज का घेतात त्याचं कारण सांगितलं आहे.

एका मुलाखतीत राखी सावंतने बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन या गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी राखी सावंत म्हणाली, बॉलिवूडमध्ये ग्लॅमरला सर्वाधिक महत्त्व असून ग्लॅमरसाठी कलाकारमंडळी ड्रग्जचं सेवन करत असल्याचं राखीनं म्हटलं आहे.

वजन वाढू नये म्हणून ड्रग्ज

कलाकारांना वजन वाढू नयेयासाठी ड्रग्ज सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मलाही काही वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी ड्रग्ज सेवन करण्याचा सल्ला दिला होता. कारण ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. वजणावर नियंत्रण राखलं जातं, असं म्हटलं जातं. पण मी त्यावेळी ड्रग्ज ऐवजी हॉट योगाची निवड केली. बॉलिवूडमधील कलाकारांना व्यायाम किंवा योग करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी असल्या शॉर्टकटचा वापर करतात, असं राखी म्हणाली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा विषय समोर आल्याने त्यासंबंधीचा तपास एनसीबीकडून होत आहे. त्यातच सिनेतारकांचे व्यवस्थापन करणाऱ्या एका एजन्सीशी संबंधित असलेली जया शाह ही रियाशी अमली पदार्थांसंबंधी संपर्कात होती. सुशांतला अमली पदार्थांची मात्रा कशी द्यावी, याबाबत रिया आणि जया यांच्यातील मेसेज संभाषण तपास संस्थेच्या हाती लागले आहे. त्यावरूनच एनसीबीने जया शाह हिची बुधवारी चौकशी केली. रियाच्या चौकशीत जी नावे समोर आली होती, त्यांची उलट तपासणी जयाकडून करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण व सारा अली खानसह चार अभिनेत्रींना नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. या दोघीही काल गोव्यावरून मुंबईत दाखल झाल्या आहेत.


हे ही वाचा – दीपिकासोबत रणवीर राहणार NCB कार्यालयात उपस्थित; विशेष परवानगीचा केला अर्ज


First Published on: September 25, 2020 6:19 PM
Exit mobile version