अक्षयचा ‘आदिपुरुष’ आणि प्रभासचा ‘रक्षाबंधन’ बॉक्स ऑफिसवर येणार आमनेसामने

अक्षयचा ‘आदिपुरुष’ आणि प्रभासचा ‘रक्षाबंधन’ बॉक्स ऑफिसवर येणार आमनेसामने

अक्षयचा 'आदिपुरुष' आणि प्रभासचा 'रक्षाबंधन' बॉक्स ऑफिसवर येणार आमनेसामने

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर झाली आहे, त्यामुळे आता बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि ‘आदिपुरुष’ या बॉक्स ऑफिसवर सिनेमांची आमनेसामने टक्कर होणार आहे. महाराष्ट्र सरकारने २२ ऑक्टोबरनंतर राज्यातील सर्व चित्रपटगृह सुरु करण्याची घोषणा केली. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या ताराखा जाहीर केल्या जात आहे. यात आता अक्षय कुमार आणि प्रभास अशा दोन मोठ्या स्टार्सचे चित्रपट एकाच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यास सज्ज झाले आहेत. २०२२ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात ‘आदिपुरुष’ आणि ‘रक्षाबंधन’ची टक्कर होणार आहे.

आदिपुरुष च्या प्रदर्शनाची तारीख याआधीच जाहीर करण्यात आली होती. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीजसाठी चित्रपटगृहात दाखल होईल. अशातच आता अक्षय कुमारचा रक्षाबंधनची रिलीज डेटही समोर आली आहे. हा सिनेमा आधी ५ नोव्हेंबर २०२१ मध्ये रिलीज होणार होता. मात्र ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

पुढील वर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरसह अक्षय कुमार मुख्य भूमिकेत छळकणार आहे. प्रभास अभिनीतचा आदिपुरुष हा सिनेमा हिंदीसह तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल. यात प्रभास व्यतिरिक्त सैफ अली खान, कृती सॅनन आणि सनी सिंह या चित्रपटात दिसणार आहेत. ‘आदिपुरुषा’ची कथा रामायणाने प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय अनेक बॉलिवूड सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यासाठी सज्ज झाले आहेत.


 

First Published on: September 27, 2021 5:46 PM
Exit mobile version