‘आदिपुरुष’मधील ‘राम सिया राम’ गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड

‘आदिपुरुष’मधील ‘राम सिया राम’ गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झाले होते ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दरम्यान, आता या चित्रपटातील दुसरे गाणे देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ट्रेलर प्रमाणेच चित्रपटाच्या गाण्याने देखील नवा रेकॉर्ड केला आहे. या गाण्याने प्रदर्शनानंतर 1 तासातच जवळपास 1.2 मिलियन व्ह्यूज मिळवल्या आहेत.

‘आदिपुरुष’च्या दुसऱ्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

‘आदिपुरुष’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘जय श्री राम राजा राम’ मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. अशातच, आता दुसरं गाणं ‘राम सिया राम’ देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे भक्तीमय गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हे गाणं प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहे. तर प्रसिद्ध गायक सचेत आणि गायिका परंपराने हे गायले आहे.

‘आदिपुरुष’ सोशल मीडियावर ट्रेंड

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सतत सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाती आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्रेक्षक गाण्यांचं खूप कौतुक देखील करत आहेत.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.


हेही वाचा :

Filmfare पासून IIFA पर्यंत… संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा डंका

First Published on: May 30, 2023 11:10 AM
Exit mobile version