म्हणून अदिती राव स्वतःला गूगलवर शोधत नाही

म्हणून अदिती राव स्वतःला गूगलवर शोधत नाही

बॉलिवूड अभिनेत्री अदिती रावने नुकत्याच झालेल्या तिच्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या आहे. त्यापैकी एक अशी की ती स्वतःला कधीच गुगलवर सर्च करत नाही.

अदितीने सांगितले की, २०११ मध्ये तिचा एक रोमॅंटिक थ्रिलर चित्रपट ‘ये साली जिंदगी’ प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने स्वतःला गुगवर शोधले असता तिचे असे काही फोटो पाहून ती थक्कच झाली. तिने स्वतःला गुगल केल्यानंतर जो काही परिणाम समोर आला, त्याने ती अजिबात आनंदी नव्हती. हे तिचे बॅकलेस फोटो तिच्या पहिल्या चित्रपटातील होते. हेच फोटो पाहून तिला धक्का बसला.

हे सगळे पाहिल्यानंतर अदितीने आपल्याबद्दल गुगलवर स्वतःचे नाव शोधणं बंद केले. मागील ८ वर्षापासून तिने पुन्हा कधी शोधलेच नाही.

अदितीने २००९ मध्ये ओम प्रकाश मेहराचा चित्रपट ‘दिल्ली-6’ मध्ये सहाय्यक भूमिका करत पदार्पण केले होते. याशिवाय फिल्म पद्मावत, भूमि, वजीर, बॉस, रॉकस्टार आणि मर्डर- ३ सारख्या चित्रपटात नजर आली होती.

First Published on: May 17, 2019 3:04 PM
Exit mobile version