भारतात ‘पठाण’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

भारतात ‘पठाण’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून शाहरुखचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली होती. परदेशातील अनेक प्रेक्षक चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, आता भारतात देखील या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. 18 जानेवारीपासूनच बुकिंग सुरुवात करण्यात आली असून प्रेक्षक अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जबरदस्त होऊ शकते असं म्हटलं जातंय.

शाहरुखच्या ‘पठाण’चा जबरदस्त धमाका

‘बेशरम रंग’गाण्याला विरोध
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

‘रूप नगर के चीते’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

First Published on: January 19, 2023 10:12 AM
Exit mobile version