सलमानचा ‘तेरे नाम’ या चित्रपटाचा १६ वर्षानी येणार सिक्वल?

सलमानचा ‘तेरे नाम’ या चित्रपटाचा १६ वर्षानी येणार सिक्वल?

बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानचे सगळेच चित्रपट हे अॅक्शनपट असतात. परंतु एकवेळ अशी होती सलमान खान फॅमिली ड्रामा चित्रपटाचा चेहरा ठरला होता. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तेरे नाम’ या चित्रपटामुळे सलमानची चित्रपटसृष्टीतील करिअरची दिशाच बदलून गेली आहे. आपल्या प्रेयसीची काळजी करणारा आणि तिला जीवापाड जपणारा सलमानचा हा अंदाज प्रत्येकाला आपलासा करून टाकणारा होता. ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमानची राधे नावाची भूमिका प्रत्येकाच्या मनात घर करून गेलीच, त्यासोबत त्याची हेअर स्टाईल खूप फेमस झाली. सलमानच्या कोणत्याही लूकला त्याचे चाहते फॉलो करून प्रसिद्ध करतात.

१६ वर्षांनी चित्रपटाचा सिक्वल

सलमानच्या चाहत्यांकरिता एक आनंदाची बातमी म्हणजे तब्बल १६ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी केला आहे. या सिक्वलमध्ये चित्रपटातील भूमिकांची नावे बदलणार नसून यामध्ये सलमान सोबत सतीश यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार की नवीन चेहरे या चित्रपटात पहायला मिळणार हे अजून समोर आले नाही. सतीश कौशिक आणि सलमान खानने भारत या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

सतीश कौशिकने एका वृत्तसंस्थेशी या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, ”तेरे नाम’ या चित्रपटाचा सिक्वल मी बनवणार असून तो लव्ह स्टोरी चित्रपट असेल. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल. ‘सलमान खान या दिवसात त्यांच्या आगामी चित्रपट भारतच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दबंग, इंशाल्लाह या चित्रपटाची शुटिंगही करत आहे.

First Published on: April 23, 2019 3:37 PM
Exit mobile version