Good News!!इरफान खान लवकरच मायदेशी परतणार

Good News!!इरफान खान लवकरच मायदेशी परतणार

इरफान खान

गुड न्युज!! इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मागील सात महिन्यांपासून कॅन्सरशी लढणारा अभिनेता इरफान खान आता मायदेशी परतणार आहे. मागील सात महिन्यांपासून इरफान खान लंडनमध्ये न्युरोएन्ड्रोक्राईन ट्युमरवर उपचार घेत होता. इरफान खानवर सुरू असलेले उपचार आता संपले असून इरफान खान एक ते दोन दिवसात मायदेशी परतणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इरफान खान हिंदी मीडियम – २ चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे. हिंदी मीडियमचे निर्माते कथा ऐकवण्यासाठी लंडनला गेले होते. कथा ऐकल्यानंतर इरफान सिक्वेलमध्ये काम करायला तयार झाला आहे. इरफानचा हिंदी मीडियम २०१७ साली रिलीज झाला होता. काही दिवसांपूर्वी इरफान खानचा ‘कारवां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दरम्यान, आजारपणामुळे  इरफाननं एका चित्रपटासह ‘गॉरमिंट’ ही वेबसीरीज देखील सोडली होती. पण मायदेशी परत आल्यानंतर इरफान खान आता जोमानं कामाला सुरूवात करणार आहे.

First Published on: October 24, 2018 2:48 PM
Exit mobile version