आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी

आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढतच आहे. एका नंतर एक बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटांना विरोध केला जात आहे. याआधी आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ तर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती, त्यानंतर शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर देखील लोक बहिष्काराची मागणी करू लागले आहेत, अशातच आता पुन्हा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या आगामी ;ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर वाढू लागली आहे.

रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्रवर बहिष्काराची मागणी
करण जौहरच्या निर्मितीमध्ये तयार झालेला ब्रह्मास्त्र चित्रपट यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. रणबीर आणि आलिया पहिल्यांदा या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. त्यांचे चाहते त्यांना चित्रपटामध्ये एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. परंतु काहीजण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. लोक ट्वीटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड करू लागले आहेत. लोक वेगवेगळी कारणं सांगत चित्रपटाला विरोध करू लागले आहेत.

 

 


हेही वाचा :1971 च्या युद्धावर आधारित ‘पिप्पा’ चित्रपटामध्ये ईशान खट्टर मुख्य भूमिकेत; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

First Published on: August 15, 2022 2:20 PM
Exit mobile version