‘अतरंगी रे’च्या यशानंतर चमकले धनुषचे नशीब; बॉलिवूडचे दोन मोठे प्रोजेक्ट केले साईन

‘अतरंगी रे’च्या यशानंतर चमकले धनुषचे नशीब; बॉलिवूडचे दोन मोठे प्रोजेक्ट केले साईन

'अतरंगी रे'च्या यशानंतर चमकले धनुषचे नशीब; बॉलिवूडचे दोन मोठे प्रोजेक्ट केले साईन

सुपरस्टार धनुष हा नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीचा राहिला आहे. यात ‘अतरंगी रे’ ब्लॉकबस्टर हिट चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. धनुषने भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:च्या नावाचा एक मोठा दबदबा निर्माण केला आहे. मास्टर स्टोरी लेखक आनंद एल राय यांच्या सहकार्याने त्याने चित्रपट उद्योग वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. यापूर्वी या पॉवरहाऊस जोडीने ‘रांझना’ हा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा बॉलिवूडला दिला, ज्याने यशाचे अनेक विक्रम मोडले.

मात्र लवकरच ही दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धनुष आणि आनंद एल राय यांचे एकत्र चांगले संबंध आहेत. चित्रपट सृष्टीतील दोन मोठ्या यशानंतर पॉवरहाऊस अभिनेता-दिग्दर्शक जोडी आनंद एल रायच्या होम बॅनर कलर यलोद्वारे निर्मित एक अॅक्शन लव्ह स्टोरीसाठी कोलॅबरेट करत आहेत.

धनुषला एक नाही तर दोन चित्रपटांची ऑफर

‘अतरंगी रे’च्या यशानंतर धनुषला आणखी दोन चित्रपटांच्या ऑफर करण्यात आल्या आहेत. आनंद एल राय यांचा फेव्हरेट धनुष त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एक कंपलीट कमर्शियल अवतारात दिसणार आहे. एवढेच नाही तर धनुषने आणखी एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊससोबत एक बिग बजेट बॉलिवूड चित्रपट साइन केला आहे.

‘अतरंगी रे’च्या यशाने धनुषसाठी बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता प्रत्येकजण त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक दिसत आहे. मात्र अतरंगी रे नंतर, धनुष त्याच्या आगामी दोन बिग बजेट हिंदी ड्रामामध्ये काय कमाल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


नवज्योत सिंग सिद्धूंनी आईला रस्त्यावर सोडलं, दिल्ली रेल्वे स्टेशनवर झाला मृत्यू- नवज्योत सिंग सिद्धूंच्या बहीणीचा आरोप


First Published on: January 28, 2022 6:27 PM
Exit mobile version