Prithviraj Postponed: आरआरआर पाठोपाठ अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ सिनेमाही पुढे ढकलला

Prithviraj Postponed: आरआरआर पाठोपाठ अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ सिनेमाही पुढे ढकलला

नवीन वर्षात बॉलिवूडमधील अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या वाटेवर होते मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट सिनेमावर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सिनेनिर्मात्यांनी सिनेमाची रिलीज पुढे ढकलली आहे. आरआरआर या बिग बजेट सिनेमानंतर अक्षय कुमारचा (Akshay kumar )  बहुप्रतिक्षीत पृथ्वीराज (Prithviraj movie ) या सिनेमाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पृथ्वीराज हा सिनेमा २१ जानेवारी २०२२ला रिलीज होणार होता. प्रेक्षकही या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते मात्र प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. महाराष्ट्रातही रात्री ८ नंतर सिनेमागृह सुरू ठेवण्यास परवानगी नाही. दिल्लीतील सिनेमागहे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. देशातील कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत याकाळात प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी येतील अशी अपेक्षाच उरलेली नाही त्यामुळे पृथ्वीराज या सिनेमाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोना काळात इतका चांगला सिनेमा रिलीज करण्यात काहीही अर्थ नाही. प्रेक्षकांपर्यत सिनेमा पोहचणारच नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट गेल्यानंतर सिनेमा रिलीज करण्याचा विचार आम्ही करू असे सिनेमाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला पृथ्वीराज हा सिनेमा काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजपूत हा शब्द पृथ्वीराज चौहान यांच्या काळात झाला नसून चांदबरदाईच्या वेळी झाला होता. यावरुन मोठा वाद झाला होता. सिनेमात अक्षय कुमारसोबत २०१७ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार आहे. मानुषी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात अभिनेता सोनू सूद आणि संजय दत्त देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा – RRR Postponed: कोरोनामुळे आरआरआरच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

First Published on: January 4, 2022 8:30 PM
Exit mobile version