सोनू सुद नंतर गुरमीत चौधरी बनला जनतेचा मसीहा, कोरोना रुग्णांसाठी उभारले हॉस्पिटल

सोनू सुद नंतर गुरमीत चौधरी बनला जनतेचा मसीहा, कोरोना रुग्णांसाठी उभारले हॉस्पिटल

सोनू सुद नंतर गुरमीत चौधरी बनला जनतेचा मसीहा, कोरोना रुग्णांसाठी उभारले हॉस्पिटल

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक कोरोनारुग्ण दगावत आहेत. देशभरात कोरोना व्हायरसची गंभीर स्थिति पाहता अनेक बॉलिवूड कलाकार लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच सावट कायम असताना सोनू सुद सुरुवाती पासूनच मसीहा बनून लोकांच्या मदतीकरिता धावून आला. आत्ता आणखीन एक सुप्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरीने लोकांच्या रुग्णालयासाठी होणारी ओढाताण पाहता नागपुर मध्ये कोव्हिड रुग्णांसाठी रुग्णालय उभारले आहे. गुरमीतच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. गुरमीतने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान याची माहिती दिली आहे की,”काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राच्या मित्राने मला कोव्हिड संबंधित मदत मागितली होती. मी त्याच्या मदतीसाठी सोशल मीडियाच्या आधारे घेतला. तेव्हा मला कळले की कोरोनामुळे देशात किती वाईट झाली आहे . माझ्या मनात आले की लोकांची मदत करण्यासाठी मला खर्‍या नायकासारखे वागावे लागेल. लोकांच्या प्रेमामुळे मी आज एक यशश्वि कलाकार आहे. आता माझी वेळ आहे देशासाठी आणि लोकांसाठी काहीतरी काम करण्याची. यासाठीच मी नागपुर शहरातील डॉक्टर सैयद वजहाताली आणि त्यांची संपूर्ण टिम मिळून आम्ही कोव्हिड रुग्णांसाठी रुग्णालय उभारत आहोत. तसेच देशातील इतर ठिकाणी सुद्धा आम्ही आणखी रुग्णालय स्थापित करणार आहोत.

गुरमीत चौधरी सध्या मालिकेमध्ये भगवान राम यांची भूमिका साकारत आहे. आणि याच भूमिकेद्वारे त्यांना मानव सेवा करण्याची प्रेरणा मिळाली आहे. असे मुलाखती दरम्यान गुरमीत चौधरीने स्पष्ट केले आहे.


हे हि वाचा – Viralvideo: CCTV फुटेज शेअर करत श्वेता तिवारी म्हणाली, शारिरीक शोषण नाही तर काय आहे?

First Published on: May 11, 2021 4:16 PM
Exit mobile version