ऐश्वर्या- आराध्या बच्चनला रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह!

ऐश्वर्या- आराध्या बच्चनला रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह!

ऐश्वर्या राय बच्चन मुलीसह नानावटी रुग्णालयात दाखल

महानायक अमिताभ बच्चन, आणि अभिषेक बच्चन नंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तीची आठ वर्षाची मुलगी आरध्या या दोघींनाही नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता या दोघींचाही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवरून ही माहिती दिली.

अभिषेकने ट्विट करत आराध्या आणि ऐश्वर्याची टेस्ट निगेटीव्ह आल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अभिषेकने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असं ट्विटमध्ये अभिषेकने म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर अजूनही नानावटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बी व अभिषेक यांचा ११ जुलैला रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आज या दोघींनाही रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. मात्र अद्याप अभिषेक आणि अमिताभ यांच्यावर उपचार सुरू आहेत.


हे ही वाचा – सुशांतच्या बहिणीने केले आत्महत्येच्या चार दिवस आधीचे Chat शेअर


 

First Published on: July 27, 2020 5:09 PM
Exit mobile version