जेव्हा माॅम ऐश्वर्या आराध्या एवढी होती…

जेव्हा माॅम ऐश्वर्या आराध्या एवढी होती…

एेश्वर्या राय बच्चन कान्स फेस्टीवल दरम्यान

प्रत्येक आईला आपल्या मुलांमध्ये स्वतःचे बालपण दिसते. लहानपणी खोडकर व खट्याळ हे सर्वच मुले असतात. अशाच लहानपणीच्या आठवणी ऐश्वर्याने नुकत्याच इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. मम्मी ऐश्वर्याने आपण आराध्याच्या वयाचे असतानाचे शाळेतील फोटो शेअर केल्याने त्याला फॅन्सचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आजच ऐश्वर्याने हे फोटो शेअर केले असून काही तासातच त्याला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

– शाळेतील ग्रुप फोटोत ऐश्वर्याला शोधणे कठीण
ऐश्वर्या राय बच्चन ही जरी इंस्टाग्रामवर नवीन असली तरीही तिला आपल्या फॅन्सला काय आवडेल याची पुरेपूर कल्पना आहे. आज अचानक ऐश्वर्याने आपल्या जुन्या शाळेतील फोटो शेअर केले. यातील एका फोटोमध्ये ऐश्वर्या ही वर्गातील बाईंसोबत ग्रुप फोटोमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्यात ती बालवर्गात असतांना आपल्या मैत्रिणींसोबत आहे. या फोटोमध्ये खुप मुले असल्याने नेमकी ऐश्वर्या कोणती हे ओळखणे थोडे कठीण आहे.

– कान्स फेस्टिव्हल दरम्यान बटरफ्लाय इंस्पायर गाऊनमुळे चर्चेत
ऐश्वर्याचा जन्म १९७३ साली कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. काही काळानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर ती आर्यविद्यामंदीर या शाळेत व त्यानंतर जयहिंद महाविद्यालयात तिने शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर ती मॉडेल, मिस इंडिया, मिस वल्ड आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. नुकत्याच झालेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याने बटरफ्लाय इंस्पायर गाऊन परिधान केला होता. या गाऊनमुळे ती अधिक चर्चेचा विषय बनली होती. ऐश्वर्या ही फक्त बॉलिवूडच नाही तर जगातील एक सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एक मोठ्या विश्रांती नंतर आता ऐश्वर्या पुन्हा चित्रपटांमध्ये झळकणार आहे. फन्ने खान हा तिचा चित्रपट ईदच्या दिवशी प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात तिच्या बरोबर अनिल कपूर व राकुमार रावही दिसणार आहेत.

First Published on: May 21, 2018 10:26 AM
Exit mobile version