तानाजी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत सैफ अली खान

तानाजी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत सैफ अली खान

काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक ओम राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मावळा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अजय देवगन तानाजी मालुसरे यांची भूमिका करणार असल्याचे जाहीर केले होते. अजय देवगननेदेखील ट्वीटरवरून या बातमीला दुजोरा दिला. आता या चित्रपटासंदर्भात एक नवी चर्चा सनेवर्तूळात होत आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. सैफ अली खान या चित्रपटात सिंहगडाचा मुघल किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेते अजय आणि सैफ यांच्यापैकी कोणीच या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

कसा असेल तानाजी?

दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटासाठी इसवी सन १६७० चा काळ उभा केला जाणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबांच असं म्हणत स्वत:च्या मुलाचं लग्न नंतर करु असं म्हणून कोंढाणा किल्ला जिंकायला गेलेल्या तानाजी मालुसरे यांचा जीवनपट या चित्रपटाद्वारे उलगडला जाणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सूकता लागली आहे.

 

१२ वर्षांनी लंगडा त्यागी आणि ओमकारा आमने सामने

१२ वर्षांपूर्वी दिग्दर्शक विशाल भरद्वाज यांनी विलियम शेक्सपियरच्या ऑथेल्लो या कादंबरीवर आधारीत ओमकारा या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अजय देवगन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अजयने यामध्ये ओमकारा आणि सैफने लंगडा त्यागी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दोघांच्याही भूमिका गाजल्या होत्या या दोघांनी आतापर्यंत दिग्दर्शक मिलन लुथरीयाच्या ‘कच्चे धागे’ आणि दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांच्या ‘एल.ओ.सी. कारगील’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

 

 

 

First Published on: July 21, 2018 5:32 PM
Exit mobile version