अजय देवगणने भगव्या झेंडावरचा ‘ओम’ काढाला; जाणून घ्या कारण

अजय देवगणने भगव्या झेंडावरचा ‘ओम’ काढाला; जाणून घ्या कारण

राज्यातही तान्हाजी टॅक्स फ्री करणार - अनिल देशमुख

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित तान्हाजी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र चित्रपट येण्याआधीच इतर ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणे तान्हाजी देखील काहीबाबतीत वादात अडकला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर यातील काही सीनवर चाहत्यांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटाचा निर्माता म्हणून अजय देवगणचा हा महत्त्वकांक्षी असा प्रोजेक्ट आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तान्हाजीच्या हातात भगवा झेंडा दाखविण्यात आला होता. या झेंड्यावर “ओम” असे लिहिलेले होते. मात्र इतिहासकारांनी आक्षेप घेतल्यानंतर आता भगव्या झेंड्यावरुन ओम काढण्याचा निर्णय घेतला आहे.

तान्हाजी हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील १०० वा चित्रपट आहे. तसेच तो निर्माता देखील असल्यामुळे चित्रपटाच्या कास्टिंगपासून ते मांडणीपर्यंत प्रत्येक गोष्टीत अजय देवगणने बारकाईने लक्ष घातलेले आहे. भगवा झेंडा हा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. शिवकालीन काळात कधीही भगव्या झेंड्यावर कोणतेही अक्षरे लिहिलेली नव्हती. इतिहासकारांनी तान्हाजीच्या टीमला ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर चित्रपटाच्या अंतिम एडिट दरम्यान ही चूक सुधारण्यात आली आहे.

तान्हाजीमध्ये बऱ्याच काळानंतर अजय देवगण आणि काजोल एकत्र काम करणार आहेत. तर सैफ अली खान आणि अजय देखील यानिमित्ताने एकत्र आले आहेत. सैफ अली खानने या चित्रपटात उदय भानची भूमिका साकारली आहे. १० जानेवारी रोजी तान्हाजी प्रदर्शित होत आहे. अजय देवगणने या चित्रपटाच्या बाबतीत एका इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे की, “४ फेब्रुवारी १६७० साली मुघल साम्राज्यावर झालेला सर्जिकल स्ट्राईकची ही गोष्ट आहे.”

 

First Published on: December 29, 2019 8:47 PM
Exit mobile version