कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा न मानण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजय देवगणने दिलं सनसनीत उत्तर

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा न मानण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजय देवगणने दिलं सनसनीत उत्तर

सध्या सगळीकडे टॉलिवूडच्या चित्रपटांनी चांगलाच धूमाकुळ घातलेला आहे. दिवसेंदिवस टॉलिवूडचं वाढत यश पाहून आता भाषेवरून वाद सुरु झाला आहे. कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या एका वादग्रस्त ट्विटनंतर संपूर्ण साउथ इंडस्ट्रीमध्ये आणि नॉर्थ इंडस्ट्रीमध्ये जोरदार वाद सुरू झाला आहे. खरंतर कन्नड अभिनेता किच्चा सुदीप याने ट्विटमध्ये हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा न मानण्याचं म्हटल्याने त्याच्या या ट्विटवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ने त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान या दोघांच्या ट्विट वादानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपलं मत मांडले आहे.

किच्चा सुदीपच्या ट्विटवर अजय देवगणची प्रतिक्रिया

अजय देवगणने दिलं उत्तर, “किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुमच्या मते जर हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही तर मग , तुम्ही तुमच्या भाषेतील चित्रपट हिंदी भाषेत का डब करता? हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे , होती आणि राहील.”

किच्चा सुदीपने केली सारवासारव
नंतर एका ट्विटमध्ये सारवासारव करत किच्चा सुदीप म्हणाला की, त्याने तर हिंदी भाषा शिकलेली आहे. तो त्या भाषेचा मान राखतो, त्याला हा वाद पुढे वाढवायचा नाही.

राम गोपाल वर्मांची प्रतिक्रिया
किच्चा सुदीपच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत राम गोपाल वर्मा म्हणाला की, तुझ्या या मुद्द्यापेक्षा चांगला कोणताच प्रश्न असू शकत नाही. पण काय झालं असतं जर तुम्ही अजय देवगणच्या ट्विटला कन्नड भाषेत उत्तर दिलं असतं. तुमचे कौतुकचं आहे. मला आशा आहे की प्रत्येकाला समजलं असेल की कोणी इथे नॉर्थ आणि साउथ नाही. भारत एक आहे.

 

गानकोकिळा लता मंगेशकर यांना 18 दिग्गज गायक वाहणार आदरांजली

First Published on: April 28, 2022 1:12 PM
Exit mobile version