अजय देवगणचा ‘भोला’ ठरला फिका; आत्तापर्यंत कमावले केवळ ‘इतके’ कोटी

अजय देवगणचा ‘भोला’ ठरला फिका; आत्तापर्यंत कमावले केवळ ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट 30 एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजयसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. अजय आणि तब्बूच्या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. प्रदर्शनाच्या सुरुवातीला या चित्रपटाने उत्तम कमाई केली.

अजय देवगण आणि तब्बूच्या ‘भोला’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 11.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. सुरुवातीच्या आठ दिवसात या चित्रपटाने 59.38 कोटी कमावले होते. मात्र, त्यानंतर याच्या कमाईत हळूहळू घसरण पाहायला मिळाली. दुसऱ्या आठवड्च्या शुक्रवारी याने 7.40 कोटी तर शनिवारी 12.20 कोटी आणि रविवारी 13.48 कोटी कमावले होते. सोमवारी भोलाने केवळ 2 कोटीची कमाई केली असून आत्तापर्यंत एकूण 74.29 कोटी कमावले आहेत.

काय आहे ‘भोला’ची कथा

भोलाची कथा एक वडील (अजय देवगण) आणि त्याची 10 वर्षांची मुलगी यांच्याभोवती फिरते. भोला तुरुंगात आहे आणि आपल्या मुलीला भेटण्यासाठी आसुसलेला आहे. 10 वर्षांनंतर त्याची सुटका झाली आणि तो आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी उत्सुक आहे, परंतु भोला अचानक अशा काही परिस्थितीत अडकतो की त्याच्या जीवाला धोका असतो. आता तो आपल्या मुलीला कधी भेटू शकेल की नाही आणि तो स्वतःला संकटातून कसे बाहेर काढेल, या विषयावर आधारित ‘भोला’ चित्रपट आहे.

दरम्यान, ‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहे.


हेही वाचा :

‘फकाट’मध्ये झळकणार साऊथचा कबीर दुहान सिंग

First Published on: April 11, 2023 9:41 AM
Exit mobile version