सोशल मीडियाचादेखील अक्षय कुमारच ‘खिलाडी’

सोशल मीडियाचादेखील अक्षय कुमारच ‘खिलाडी’

अभिनेता अक्षय कुमार

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ ही अक्षयकुमारची ओळख आहे. पण आता बॉलीवूडबरोबरच सोशल मीडियाचादेखील अक्षयकुमार ‘खिलाडी’ बनला आहे. अक्षय कुमारचे सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर २ कोटी फॉलोअर्स बनले आहेत. ही संख्यादेखील इन्स्टावर त्यानं खरंतर पार केली आहे. या आनंदातच अक्षयनं एक व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अक्षय नेहमीच आपल्या अकाऊंटवरून वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. शिवाय अक्षयचं फॅन फॉलोईंगदेखील खूप जास्त आहे. अक्षयनं एका वेगळ्या अंदाजात ही गोष्ट सेलिब्रेट केली आहे.

अक्षयनं व्यक्त केला आनंद

अक्षयनं एक व्हिडिओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘हा क्षण मी सेलिब्रेट करत आहे याचं मलाच आश्चर्य वाटत आहे. आता माझं कुटुंब २ कोटीपर्यंत वाढलं आहे आणि त्यासाठी मी खूपच खुश आहे. माझ्याबरोबर राहण्यासाठी सर्वांचेच आभार,’ अशा तऱ्हेची कॅप्शन देत अक्षय कुमारनं आपल्या सर्व चाहत्यांनादेखील आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं आहे.

अक्षय सध्या ‘गोल्ड’च्या प्रमोशनमध्ये

अक्षयकुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सध्या अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हॉकी खेळाडूच्या खऱ्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असून स्वतंत्र भारताचं पहिलं गोल्ड मेडल भारताला या खेळाडूनं मिळवून दिल्याची ही गोष्ट आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयदेखील दिसणार असून तिचं बॉलीवूडमध्ये पदार्पण होत आहे. तर अमित साध, कुणार कपूर आणि विनीत कुमार सिंह यांचीदेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

First Published on: August 8, 2018 12:30 PM
Exit mobile version