अक्षय कुमारने चाहत्यांना दिली ‘ही’ गुड न्यूज

अक्षय कुमारने चाहत्यांना दिली ‘ही’ गुड न्यूज

अक्षय कुमार

डिसेंबर महिन्यात बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार प्रेक्षकांना एक गुड न्यूज देणार आहे. हे आम्ही नाही तर चक्क अक्षयनेच ट्वीट करून सांगितले आहे. आता ही नेमकी काय गुड न्यूज आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर लवकरच अक्षय गुड न्यूज या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर करिना कपूर मुख्य भुमिकेत दिसेल. राज मेहता यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे. २७ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अक्षयनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.

First Published on: April 28, 2019 5:39 PM
Exit mobile version