खिलाडी कुमारने चाहत्यांना दिली खुशखबर!

खिलाडी कुमारने चाहत्यांना दिली खुशखबर!

खिलाडी कुमारने चाहत्यांना दिली खुशखबर!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अक्षयने कॅटरीना कॅफसोबतचा (Katrina Kaif)चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi)ची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पहिल्यांदा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता अक्षय कुमारने स्वतः या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ३० एप्रिलला ‘सूर्यवंशी’ चित्रपट सर्व थिअटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अक्षय कुमारने ‘सूर्यवंशी’बाबत लिहिले आहे की, ‘आम्ही तुम्हा सर्वांना चित्रपटाच्या दमदार एक्सपीरियंसचे आश्वासन दिले होते आणि ते आश्वासन पूर्ण होईल. आता अखेर प्रतीक्षा संपली..पोलिस येत आहेत. ‘सूर्यवंशी’ चित्रपटगृहात ३० एप्रिल २०२१ला प्रदर्शित होणार आहे’ या पोस्टसोबत अक्षयने #Sooryavanshi30thAprilचा वापर केला आहे. अक्षय कुमार आणि कॅटरीना कॅफच्या या चित्रपटाची बऱ्याच वेळापासून प्रतीक्षा केली जात होती. अखेर तो ३० एप्रिलला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

अक्षय कुमार आणि कॅटरीना कॅफ व्यतिरिक्त ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंह दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांना तो चांगलाच आवडला. आता प्रेक्षकांना बऱ्याच काळानंतर अक्षय आणि कॅटरीना या जोडीला बघायला मिळणार आहे.


हेही वाचा – टायगरच्या बहिणीला पाहून चाहते म्हणाले, ‘क्वीन ऑफ हॉटनेस’


First Published on: March 14, 2021 6:19 PM
Exit mobile version