‘या’ कारणांमुळे दिग्दर्शकाने सोडला ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट

‘या’ कारणांमुळे दिग्दर्शकाने सोडला ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट

laxmmi-bomb

नुकतचे अक्षय कुमारचे ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या अक्षयच्या लूकची खूप चर्चा ही झाला. अनेकांनी या लूकची प्रशंसा केली. पण अक्षयचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीजड होताच चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंन्स नाराज झाले आणि त्यांनी हा चित्रपट सोडला. त्यांना कोणतीही कल्पना न देता. चित्रपटाचा लूक रिलीज केल्यामुळे त्यांनी हा चित्रपट सोडला आहे. सोशलमिडीयावर पोस्ट करत त्यांनी चित्रपट सोडल्याचे जाहीर केले.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा साऊथची सुपहिट फिल्म ‘कंचना’ या चित्रपटाचा रिमेक आहे. राघव लॉरेंन्स यांनी कंचनामध्ये काम केले आहे. आणि कंचना च्या सिक्वेलचे दिग्दर्शनही केले होते. त्यानंतर राघव यांनी हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’ याचे दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला.

ट्विटरवर राघव यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘तामिळमध्ये एक जूनी म्हण आहे की, ज्या घरात तुम्हाला किंमत मिळत नाही अशा घरात तुम्ही पाऊलही ठेऊ नका. या जगात पैश्यापेक्षाही तुमचा आत्मसन्मान महत्वाचा आहे. म्हणून मी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागची कारणं मी तुम्हावा सांगू इच्छितो. या मागे अनेक कारणं आहेत,पण त्यातलं एक म्हत्त्वाच कारण म्हणजे १८ मेला चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या विषयी मला जराशीही कल्पना नव्हती. मला न सांगता हा फर्स्ट लूक रिलीज केला गेला. मला दुसऱ्याच एका व्यक्तीकडून याविषयी समजले. आपल्या चित्रपटाच्या पोस्टरबद्दल आपल्याला माहित नसणे हे एक दिग्दर्शक म्हणून हे खूप दुखद आहे. असं अन्य दिग्दर्शकांबरोबर होता कामा नये. ‘

राघवने पुढे लिहीले, ‘मी मनात आणलं तर माझी स्क्रीप्ट मी माझ्याकडे परत घेऊ शकतो. कारण मी यासाठी कोणतचं अॅग्रीमेट साईन केलेलं नाही. पण मी असं करणार नाही कारण हा व्यवहारीक दृष्ट्या योग्य नाहीये. मी माझी स्क्रीप्ट द्यायला तयार आहे कारण मी अक्षय कुमार सरांची खूप इज्जत करतो. अक्षय कुमार यांना भेटून ही स्क्रीप्ट मी त्यांना देणार आहे. संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो की हा चित्रपट यशस्वी होईल. ‘

चित्रपटात अक्षय कुमार बरोबर कियारा अडवाणी मुख्य भुमिकेत आहे. अक्षय कुमार एका किन्नराच्या भुमिकेत दिसणार आहेत. पुढच्या वर्षी ५ जूनला हा चित्रपट रिलीज होईल.

First Published on: May 19, 2019 12:07 PM
Exit mobile version