२०२० मध्ये खिलाडीचा सुपर हिट चौकार

२०२० मध्ये खिलाडीचा सुपर हिट चौकार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा एकदा चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. २०२० या आगामी वर्षात अक्की एक नव्हे तर तब्बल चार चित्रपट त्याच्या चाहत्यांकरता घेऊन येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’, तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘बच्चन पांडे’ हे चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार असून या सर्व चित्रपटांच बजेट मिळून तब्बल ५०० कोटींच्या आसपास आहे. तसेच २०२१ मध्ये प्रदर्शित बेल बॉटम हा गुप्तहेरावर आधारित चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात खिलाडी सोबत कतरिना कैफही दिसणार

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा सिम्बा चित्रपटात रोहितने केली होती. या चित्रपटाचे बजेट ८० कोटीहून अधिक असून अक्षय कुमार सोबत कतरिना कैफही दिसणार आहे. तर तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २०२० च्या ईदला प्रदर्शित करणार असून या चित्रपटात कियारा अडवाणी आणि अक्षय कुमार हे प्रथ्मच एका हॉरर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे बजेट जवळजवळ १०५ कोटी इतके आहे.

अक्कीसोबत विश्वसुंदरी या चित्रपटात झळकणार

तसेच २०२० मधील दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लरही झळकणार असून या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी इतके असणार आहे. तर ख्रिसमस निमित्ताने अक्कीचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात अक्षय कुमारसोबत क्रिती सॅनन ही सुद्धा झळकणार आहे.


हेही वाचा – ‘मी अजून जिवंत आहे’; डिंपल कपाडिया वैतागली!


 

First Published on: November 17, 2019 5:57 PM
Exit mobile version