राजकीय प्रवेशाबद्दल अक्षयने केला मोठा खुलासा

राजकीय प्रवेशाबद्दल अक्षयने केला मोठा खुलासा

अभिनेता अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार लवकरच राजकारणात पाऊल ठेवणार आहे. खिलाडी अक्षय कुमार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे, अक्षयला भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार आहे अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चांना आता काहीच अर्थ उरला नाहीये. कारण अक्षयने ट्वीटकरत निवडणूक लढवणार नसल्याच जाहीर केलं आहे.

‘तुम्ही माझ्या ट्वीटची दखल घेतली याबद्दल धन्यवाद. पण मी कोणतीच निवडणूक लढवणार नसल्याच स्पष्ट करत आहे.’

अक्षय कुमारच्या एका ट्वीट नंतर अक्षयच्या राजकीय प्रवेशा चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून त्याला पंजाबमधील गुरुदासपूर येथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशीही चर्चा सुरू होती.

काय होतं अक्षयच्या ट्वीटमध्ये

‘अत्यंत्य नवखी आणि कधीही स्पर्श न केलेल्या अशी सीमा आज ओलांडत आहे. आज असं काही करायला जात आहे, जे या पूर्वी मी कधीही केले नव्हते. उत्सुकता आणि थोडी निराशा अशा दोन्ही भावना मनात आहेत. पुढील अपडेटसाठी लवकरच तुम्हाला कळवेन’, असे अक्षयने आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

अक्षयने केलेल्या या ट्वीटमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं कुठेच स्पष्ट म्हटलेलं नव्हतं. पण आता अक्षयने केलेल्या दुसऱ्या ट्वीटमुळे अक्षय निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता अक्षयने केलेल्या ट्वीटनुसार अक्षय नेमकं काय करणार आहे लवकरच तुम्हाला कळेल.

First Published on: April 22, 2019 3:34 PM
Exit mobile version