अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ ओटीटीवर महिन्यातला सर्वाधिक पाहिलेला चित्रपट!

अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ ओटीटीवर महिन्यातला सर्वाधिक पाहिलेला चित्रपट!

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या अभिनयाने आणि चित्रपटांनी प्रेक्षकांना थक्क केले आहे. डिज़्नी+ हॉटस्टारवर नंबर 1 वर ट्रेंड करत असलेल्या त्याच्या अलीकडील ‘कठपुतली’ने आणि त्याच्या उल्लेखनीय आणि आकर्षक कथेने सर्वांनाच थक्क केले आहे. चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत आहे जो एका सीरियल किलरला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. या मोहिमेमध्ये तो विविध रणनीती अवलंबताना दिसतो. ‘कठपुतली’ हे एक संपूर्ण मनोरंजन पॅकेज आहे कारण ते आपल्या रहस्यमय कथानकाने प्रेक्षकांना प्रत्येक फ्रेममध्ये खिळवून ठेवते आणि त्याच वेळी प्रत्येक सेकंदाला प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करते. अक्षय कुमार अभिनित या चित्रपटाने या महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडले असून ‘कठपुतली’ या महिन्यातील सर्वाधिक आवडलेला आणि सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे.

‘कठपुतली’ला सर्व बाजूंनी कसे प्रेम मिळत आहे याबद्दल बोलताना, व्यापार विश्लेषक जोगिंदर तुतेजा म्हणतात, “चित्रपट चालतात तेव्हा ही नेहमीच चांगली गोष्ट असते. बॉलीवूडसाठी ती आनंदाची गोष्ट असते, मनोरंजन उद्योगासाठी ते नेहमीच फायद्याचे असते. ओटीटीवर कठपुतली आणि मोठ्या पडद्यावर ब्रह्मास्त्रने सकारात्मक व्हाईब्स परत आणले आहेत.”

कठपुतलीने डिज़्नी+ हॉटस्टारवर 50 दशलक्ष व्ह्यूव्ज मिळवले असून तो या महिन्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमार आणि रकुल प्रीत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी त्यांच्या पूजा एंटरटेनमेंट बॅनरखाली तयार केला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर राजीव रवी यांनी ‘कठपुतली’चे चित्रीकरण केले आहे.


हेही वाचा :

आरडाओरड करू नका नाहीतर… पत्रकारांवर तापसी पन्नूचा राग अनावर

First Published on: September 15, 2022 2:18 PM
Exit mobile version