‘दादी’मुळे प्रेक्षकांनी मला हिणवलं – अली असगर

‘दादी’मुळे प्रेक्षकांनी मला हिणवलं – अली असगर

अभिनेता अली असगर दादी साकारताना

कॉमेडियन अली असगर यालाही अत्याचाराचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा स्वतः अलीने केला आहे. छोट्या पडद्यावरील दि कपिल शर्मा शोमध्ये अली असगर हा दादीची भूमिका साकारत होता. ही भूमिका तब्बल ३ वर्ष त्याने साकारली. मात्र याच दादीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी त्याला छळल्याच तो सांगतो. नुकतच दिल्लीमध्ये काही लोकांनी अलीसोबत फोटो काढताना दादी…दादी म्हणून हिणवले. या ठिकाणी अली त्याच्या आगामी कार्यक्रम कानपूरवाले खुरानासच्या प्रमोशनसाठी केला होता. या नवीन कॉमेडी शोमध्येही अली चौथी नावाचे महिला पात्र साकारणार आहे. स्त्री पात्र साकारताना अतिशय सहज वावरतान अली दिसतो. मात्र या पात्रांमुळे त्याला प्रत्यक्ष आयुष्यात त्रास सहन करावा लागत असल्यााचे तो सांगतो.

नेमकं काय घडलं

दिल्लीत एका विवाह सोहळ्यात परफॉर्मन्स करताना अली असगरला हा अनुभव आला. याबाबत अली सांगतो, मी जेव्हा कधी अशा शोसाठी जातो. सूत्रसंचालकाला माझं घेऊ नको, असं सांगतो. थेट दादीच्या वेशात प्रवेश करतो. दिल्लीतील या कार्यक्रमात शोदरम्यान अनेक प्रेक्षक मद्यपान करूनच बसले होते. माझ्या प्रवेशानंतर त्यांनी माझ्यावर जो हल्ला चढवला. तो थक्क करणारा होता. काहींनी माझ्या छातीवरून हाक फिरवला तर काहींनी पाठीमागे हात लावला. मलाही छेडछाडीचा सामना करावा लागला. माझ्या टीममध्ये असणाऱ्या एका मुलीने मला त्या संकटातून वाचवलं. मी त्या जागेवरून बाहेर पडूच शकलो नसतो.

First Published on: December 13, 2018 10:23 AM
Exit mobile version