प्रेमात पडलेल्या आलियाने वरुणला रणबीरच्या नावाने मारली हाक

प्रेमात पडलेल्या आलियाने वरुणला रणबीरच्या नावाने मारली हाक

मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

आलिया भट्टने तिच्या काही मुलाखतीमध्ये हे मान्य केले की तिला रणबीर कपूर आवडतो. आलिया आणि रणबीर दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याने दोघांच्या रोमॅंटिक कॅमेस्ट्रीची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये होताना दिसत आहे. आलिया भट्ट तिच्या काही आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिला रणबीरला वेळ देता येत नाही. यामुळेच तिला रणबीर कपूरची किती आठवण येते, हे तिने एक चुक करून स्वतः सिद्ध केले आहे.

या दरम्यान आलिया भट्ट् आपल्या कलंक चित्रपटाच्या पुर्ण स्टार कास्टसह एका शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी वरूण धवन आणि आलिया एकत्र बसले होते. वरूण आलियासोबत मस्ती करत होता. वरूण आलियाच्या केसांशी खेळत होता. त्यावेळी आलिया वरूणवर थोडी चिडली आणि वरूणचे नाव घेण्याऐवजी तिने रणबीरचे नाव चुकून सर्वांसमोर घेतले. आलियाने वरूणचे नाव घेण्याऐवजी रणबीर असे नाव घेतल्याने तिच्यासह शोमध्ये उपस्थित असलेले आद‍ित्य कपूर, सोनाक्षी आणि वरुण धवन सगळेच आलियाची थट्टा करू लागले.यावेळी आलियाने हसून लाजत आपला चेहरा खाली केला.

आलियाने केलेल्या गोड चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओतून आलियाचे रणबीरवर असलेले प्रेम व्यक्त होताना दिसते. मागील काही दिवसात आलिया-रणबीर लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा रंगताना दिसत होती. सध्या आलिया आपल्या येणरा कलंक आणि सडक २ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.

First Published on: April 16, 2019 11:20 AM
Exit mobile version