Alia Bhatt- आलिया भट्ट राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला घेते थेरपी

Alia Bhatt- आलिया भट्ट राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला घेते थेरपी

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे म्हणजेच राहाचे स्वागत केले.

आता आलियाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये आलियाने सांगितले की, तिच्या मुलीच्या जन्मानंतर ती तिच्या मानसिक आरोग्यासाठी दर आठवड्याला थेरपी घेते.

मातृत्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ती अनेक वर्षांपासून ही थेरपी घेत आहे. आलियाने म्हटले आहे की थेरपीने तिला घर, बाळ आणि तिचे काम सांभाळण्यास मदत होते.

मातृत्व आणि मानसिक आरोग्याविषयी बोलताना आलिया म्हणाली – मला नेहमीच आश्चर्य वाटते की लोक काय विचार करत आहेत. त्यांना खरंच वाटतं की मी सगळं व्यवस्थित सांभाळत आहे की ते फक्त माझं समाधान करण्यासाठी असं बोलत आहेत?

पण मी माझ्या मानसिक आरोग्यासाठी खूप मेहनत घेते. मी दर आठवड्याला थेरपीला जाते. जिथे मी ही भीती व्यक्त करते. त्यामुळे मला मदत होत असल्याचे आलियाने या मुलाखतीत म्हटलं आहे.

मातृत्व पहिल्या किंवा पाचव्या किंवा अगदी दहाव्या दिवशी मला समजेल अशी ही गोष्ट नाही, ही एक सतत विकसित होणारी, सतत वाढत जाणारी प्रक्रिया आहे. आलियाने सांगितले की थेरपीने तिला कशी मदत केली . कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत लव्ह अँड वॉरमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच जिगरामध्ये दिसणार आहे.


आलिया सध्या विविध प्रोजेक्टमध्ये बिजी असली तरी मुलगी राहासाठी ती वेळ काढते. बऱ्याचेवळा आऊटडो्र शुटींगसाठी बाहेरगावी जातानाही राहाला सोबत नेण्यास ती प्राधान्य देते.


Edited By- Aarya Joshi

First Published on: April 24, 2024 5:36 PM
Exit mobile version