वाढदिवसानिमित्त आलियाने शेअर केला ‘सीता’चा फर्स्ट लूक

वाढदिवसानिमित्त आलियाने शेअर केला ‘सीता’चा फर्स्ट लूक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने १५ मार्च रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठे सरप्राइज दिले आहे. आलिया भट्ट तिचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसादिवशी आलियाने ‘आरआरआर’ चित्रपटामधील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे आलिया तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजमौली आहेत. आलिया या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. तिने तिच्या वाढदिवासादिवशी चाहत्यांसोबत चित्रपटातील तिच्या पात्राबद्दल सांगितले आहे. यासंबंधीची एक पोस्टही तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आलियाने शेअर केल्या या फोटोत ती ब्लेक शेडेड जागेवर ती बसली आहे. तिच्या फर्स्ट लूक पाहून असे दिसते की एखाद्या मंदिरात बसली आहे. व मंदिरात रामाची मूर्ती देखील पाहायला मिळते.


हे वाचा- खिलाडी कुमारने चाहत्यांना दिली खुशखबर!

First Published on: March 15, 2021 2:51 PM
Exit mobile version