आमिर खानच्या मुलीने केला प्रेमाचा खुलासा!

आमिर खानच्या मुलीने केला प्रेमाचा खुलासा!

Ira Khan With Mishaal Kirpalani

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचे रिलेशन म्युझिशिअन मिशाल क्रिपानी याच्यासोबत आहे, असे सोशल माध्यमांवर फोटो पोस्ट करून जाहीर केले आहे. ते एकमेकांना डेट करत आहेत ही बातमी तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट करुन सांगितली. इन्स्टाग्रामवरच्या ‘आस्क मी एनिथिंग’च्याद्वारे फॅनशी तिने संवाद साधला. या दरम्यान तिला एका फॅनने ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा तिने आपल्या फॅनला मिशाल सोबतचा मिठीत असतानाचा फोटो स्टोरीला पोस्ट करुन अशा प्रकारे फॅनला प्रतिक्रिया दिली आणि ही स्टोरी तिने मिशालला देखील टॅग केली.

तसेच तिने मिशाल गाणं गात असल्याचा व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मिशालने देखील इराच्या वाढदिवसाच्या दिवशी फोटो पोस्ट केला. जेव्हा आमीर खान कॉपी विथ करण या शो मध्ये आला होता. तेव्हा त्याने इराला फिल्म मेकिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे असा खुलासा केला होता.

First Published on: June 13, 2019 11:26 AM
Exit mobile version