Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी, 14 कोटीची केली जमीन खरेदी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी, 14 कोटीची केली जमीन खरेदी

अयोधा : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटीदेखील उपस्थित असणार आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं अमिताभ बच्चन यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी घर बाधंण्यासाठी कोट्यावधी जमीन विकत घेतली. अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. याची चर्चा सर्वत्र होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसरा, अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर द हाउस ऑफ़ अभिनंदन (The House of Abhinandan Lodha) यांच्या 7-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक जागा खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सने माहिती दिली आहे की, अमिताभ बच्चन हे अंदाजे 10,000 स्क्वेअर फुटांचे घर बांधणार आहेत आणि त्याची किंमत 14.5 कोटी रुपये आहे.

हेही वाचा… Ram Temple: राम मंदिर लोकार्पणाचे कोणी स्वीकारले, कोणी नाकारले निमंत्रण? सर्व माहिती एका क्लिकवर

22 जानेवारी रोजी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे. त्याच दिवशी अमिताभ बच्चन यांच्या प्रोजेक्ट शरयूचे उद्घाटन होणार आहे. प्रोजेक्ट शरयू हा 51 एकरात पसरलेला आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला असून सध्या ते मुंबईत राहतात.

गुंतवणूकीबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, अयोध्येचं एक विशेष स्थान आहे. आध्यात्मिकता, सांस्कृतिक समृद्धी आणि भौगोलिक सीमांनी एक भावनात्मक संबंध निर्माण केला आहे. या जागतिक आध्यात्मिक राजधानीत आपलं घर व्हावं अशी इच्छा आहे. अयोध्येत सरयूच्या ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ सोबत नवा प्रवास करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

First Published on: January 15, 2024 11:48 AM
Exit mobile version