बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. अमिताभ रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आहेत. मात्र तेथूनही ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना अपडेट देत आहेत. कोविड पॉझिटिव्ह झाल्याची बातमी देखील त्यांनी स्वतःहूनच सोशल मीडियावर टाकली होती. आता त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट टाकून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “प्रार्थना आणि आशीर्वादाच्या मुसळधार पावसामुळे स्नेहरुपी बंधनाचे बांध तुटले आहेत. तुमच्या अपार प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या एकटेपणाच्या अंधाराला तुम्ही प्रकाशमय केले आहे. प्रत्येकाचे व्यक्तिगत आभार मानू शकत नाही, फक्त नतमस्तक होऊन मी सर्वांचे आभार मानतो.”
T 3593 –
प्रार्थनाओं, सद भावनाओं की मूसलाधार बारिश ने
स्नेह रूपी बंधन का बांध तोड़ दिया है ;
बह गया, तर कर दिया मुझे इस अपार प्यार ने,
मेरे एकाकी पन के अंधेरे को जो तुमने,
प्रज्वलित कर दिया है
व्यक्तिगत आभार मैं व्यक्त न कर पाउँगा ,
बस शीश झुकाके नत मस्तक हूँ मैं ?— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 13, 2020
नानावटी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. शनिवारी जेव्हा अमिताभ यांनी स्वतःहून याची माहिती सर्वांना दिली तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. सर्वांकडून प्रार्थना केली जात होती. त्यानंतर लगेचच अभिषेक देखील पॉझिटिव्ह असल्याची बातमी बाहेर आली होती. तर दुसऱ्या दिवशी रविवारी एश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी समोर आली होती. तर सुदैवाने जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.