बिग बींनी ‘या’ कलाकाराचे केले कौतुक’ म्हणाले त्याच्या ऐवढं मोठ व्हायचयं!

बिग बींनी ‘या’ कलाकाराचे केले कौतुक’ म्हणाले त्याच्या ऐवढं मोठ व्हायचयं!

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची सिनेमा सृष्टीतील कारकीर्द अनेकांना थक्क करणारी आहे. बीग बींचा अभिनयातील उत्साह अनेकांना लाजवणारा आहे. अमिताभ बच्चन हे लवकरच एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बीग बींनी त्यांच्या ब्रम्हास्र या सिनेमाचे शुटींग सुरू असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी अभिनेता रणबीर कपूर सोबतचा फोटो हे शेअर करताना कॅपशन देत त्यांनी लिहीले आहे की, ‘माझ्या आवडत्या कलाकारासोबत काम करताना’, ‘माझा आवडता कलाकार’, ‘रणबीर कपूर’ असी कॅपशन दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये अमितभजी हे चार खुर्चांवर बसलेले दिसत आहेत. यावर रणबीरच्या टॅलेंटची स्तुती करताना त्यांनी म्हटल आहे की, ‘मला अशा प्रतिभावंत कलाकारापर्यंत पोहचण्यासाठी चार खुर्च्या लागल्या’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

आजच्या तरूणाईचा लाडका अभिनेता म्हणून ओळख असलेला रणबीर कपूर हा पहिल्यांदाच बीग बींसोबत एकत्र दिसणार आहे. अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा ब्रम्हास्रच्या सेट वरील काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ‘माझ्या आवडत्या कलाकारांसोबत मी सकाळी सहा वाजल्यापासून अभिनय, सराव आणि चित्रीकरणाला सुरूवात करतो’ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

 

अमिताभ बच्चन यांच्या सोबत रणबीर कपूरचे वडील अभिनेता रिशी कपूर यांनी अनेक चित्रपटातून काम केले आहे. रिशी कपूर आणि अमिताभ हे १९८३ मध्ये कुली, १९९१ मध्ये अजूबा, १९८१ मध्ये नसीब, १९७७ मध्ये अमर अकबर एँथनी यांसारख्या सिनेमात त्यांनी एकत्रित काम केले आहे. तर रणबीरची आई अभिनेत्री नितू सिंग यांनी देखील १९७६ च्या दशकात परवरीश तर १९७८ साली कसमे वादे या सिनेमातून आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

या आधी देखील केले रणबीरचे कौतुक

अमिताभजींनी रणबीरचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही आहे तर या आदी देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रणबीरचे कौतुक केले होते. ‘रणबीरचा चेहराच खुप काही सांगून जातो त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अधिक कष्ट करण्याची गरज पडत नाही मात्र, मला यावर अधिक मेहनत घ्यावी लागते’. असे त्यांनी या मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

रणबीरची प्रतिक्रिया

रणबीरने लिहीले आहे की, यापेक्षा चांगले आणखी काय असू शकते. बच्चन साहेब हे माझ्यासाठी माझ्या परिवारातलेच एक आहेत. ‘मला ते कायमच खुप आवडतात कारण ते मला माझ्या कुंटुंबातलेच एक वाटतात’ असे त्याने म्हटले आहे.

कसा असेल सिनेमा

हा पहिला सिनेमा असावा ज्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्रित काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात पहिल्यांदाच बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर action Mode मधून चाहत्यांसमोर येणार आहे. त्यामुले चाहत्यांच्या मनात देखील या सिनेमाच्या दडष्टीने उत्सुकत्ता पाहायला मिळते आहे.

First Published on: February 26, 2020 2:18 PM
Exit mobile version