बिग बींचे पत्र वाचून नीना गुप्ता झाल्या भावुक

बिग बींचे पत्र वाचून नीना गुप्ता झाल्या भावुक

नीना गुप्ता

प्रत्येक कलाकाराला आपण केलेल्या अभिनयाची पोच पावती मिळालेली आवडते. आणि ती स्तुती जर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन करत असतील तर कलाकारासाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे. नुकताच प्रकाशित झालेला ‘बधाई हो’ या चित्रपटात नीना गुप्ता यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी कौतूक केलं आहे. बच्चन यांनी नीना गुप्ता यांना पत्र लिहिलं आहे. नीना यांनी पत्राचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच बरोबर त्यांनी बिग बींचे आभार मानले आहेत. आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव यांनी चित्रपटात मुख्य भुमिका केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूपरहिट ठरला. दमदार कथनकाच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  १०० कोटींहून अधिक कामाई केली.

नीनाची भुमिका  

या चित्रपटात नीनाने एका ५० वर्षीय महिलेची भूमिका साकारली आहे. चित्रपटात नीना गरोदर असल्याचे दाखवले आहे. चित्रपटात नीनाचे नाव प्रियंवदा कौशिकी आहे. जीतेंद्र आणि प्रियवंदा हे एकमेकांवर खूप प्रेम करत असल्याचे चित्रपटात दाखवले आहे. साधारण याच कथनावर चित्रपट आधरित आहे.

काय म्हणाल्या नीना

“तुमच्याकडून पत्र आणि पुष्पगुच्छ मिळाला म्हणून मला आनंद झाला आहे. माझे डोळ्यात आनंदाश्रू आलेत. धन्यवाद अमिताभ सर.” – नीना गुप्ता, अभिनेत्री

First Published on: November 16, 2018 12:30 PM
Exit mobile version